भा. स. फडणीस - लेख सूची

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग ५) 

‘गणित एक भाषा‘ ह्याविषयी थोडेसे  गणिताने विकसित केलेल्या संबोधांचा सर्व विज्ञानात पदोपदी उपयोग होतो म्हणून गणित ही सर्व विज्ञानाची भाषा आहे असे म्हणतात. बोल भाषेतील विचारांना चिन्हांचा उपयोग करून जेव्हा लेखी स्वरूपात मांडले जाते तेव्हा त्याला गणिती भाषांचे स्वरूप प्राप्त होते. म्हणून ही गणिती भाषा वाचता येणे आणि समजणे ह्या क्षमतांना प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान …

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग ४) 

अपूर्णांकाविषयी थोडेसे  अपूर्णांक :- अपूर्णांकासाठी जे चिन्ह वापरतात त्याचा अर्थ मनात रुजल्याशिवाय अपूर्णांकाचे गणित मुलांना समजत नाही. म्हणजे एकाच्या 4 समान भागापैकी 3 भाग. अपूर्णांकाचे संबोध मुलांना समजावून सांगताना क्षेत्रफळाचा उपयोग करावा लागतो.  सममूल्य अपूर्णांक :- एका वर्तुळाचे 4 समान भाग करून 3 भाग अधोरेखित केल्याने वर्तुळाचे जे क्षेत्रफळ व्यापल्या जाते तेवढेच क्षेत्रफळ वर्तुळाचे 8 …

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग ३)

वजाबाकीची आणखी एक रीत हातच्याची वजाबाकी शिकवताना आकड्यांची खोडाखोड करून आकड्यांची नव्याने मांडणी करावी लागते. ह्या सवयीचे दुष्परिणाम भागाकाराची क्रिया करताना अनुभवास येतात. म्हणून मनातल्या मनात क्रिया करता येण्याची क्षमता विद्यार्थ्यांत रुजवणे, हा अध्यापनाचा एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे. विद्यार्थ्यांना कोणत्या सवयी आत्मसात करणे फायद्याचे ठरेल ह्याचा निर्णय शिक्षकाने घ्यायचा असतो. वजाबाकीच्या आणखी एका रीतीचा …

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग २)

संख्यांची लेखनपद्धती 0, शून्याची संकल्पना साकारल्याशिवाय हे शक्य होणार नव्हते. म्हणून दशक संकल्पनेनंतर ) ची संकल्पना सुचणे हा गणिताच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पण मोठ्या संख्या लिहिता येण्यासाठी आणखी एका संबोधाचे आकलन होणे आवश्यक होय. लिहिताना आपण कागदाच्या पानाचा, किंवा फळ्याचा (जमिनीवरील धुळीचासुद्धा) उपयोग करतो. पानाला डावी बाजू, उजवी बाजू, तसेच खालची बाजू असते. …

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग १)

प्राथमिक शाळेत विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेत मुलांना अभ्यासाबाबत ज्या चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात त्यांचा त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो. म्हणून प्राथमिक शिक्षणात गणिताच्या अध्यापन आणि अध्ययन पद्धतींना आत्यंतिक महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे. संख्याबाबतचे मूलभूत संबोध मुलांना अवगत न झाल्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या प्राथमिक क्रिया करताना मुलांच्या हातून सतत चुका …